Home नाशिक सिन्नरचा सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

सिन्नरचा सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून कलम १०१ चे प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना (bribery) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Assistant Registrar of Sinner in the net of bribery

नाशिक : सहकारी संस्थांचे सिन्नरचे सहायक निबंधक एकनाथ प्रताप पाटील याला एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून कलम १०१ चे प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सिन्नर तालुक्यातील एका पतसंस्थेला थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीसाठी सहकार कायदा १९६० चे कलम १०१ चे प्रमाणपत्र (नोटीस) मिळविणे गरजेचे होते. या पतसंस्थेने १७ थकबाकीदारांची प्रकरणे सिन्नरच्या सहायक निबंधक कार्यालयात सादर केली होती. तथापि, सहायक निबंधक संशयित एकनाथ पाटील याने १७ प्रकरणांचे कलम १०१ प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडे ३४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास प्राप्त झाली होती.

Web Title: Assistant Registrar of Sinner in the net of bribery

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here