Home नाशिक दहावीच्या परीक्षेला जाताना दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

दहावीच्या परीक्षेला जाताना दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Nashik Accident:  सिन्नर-घोटी महामार्गावर अपघात, दोघा विद्यार्थ्यांना समोरून येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात.

Two students died while going for class 10 exams

नाशिक: भविष्याची पहिली पायरी चढण्यासाठी दहावी परीक्षेच्या पहिल्या पेपरला दुचाकीवरून निघालेल्या सिन्नर तालुक्यातील दोघा विद्यार्थ्यांना समोरून येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा करुण अंत झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर आगासखिंड शिवारात गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी आणि काळजाला पिळवटून टाकणारी घटना घडली. यामुळे शिक्षणक्षेत्रासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील दर्शन शांताराम आरोटे (१४) व शुभम रामनाथ बरकले (१४) हे दोघे विद्यार्थी गुरुवारी सकाळी दहावीचा पेपर देण्यासाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्रावर जात असताना हा अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की दोघेही दूरवर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा झाला. मृत्यू

Web Title: Two students died while going for class 10 exams

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here