लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने एकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
श्रीरामपूर | Suicide: कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारी बुडाल्याने नैराश्येतून एका मजुराने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे घडली आहे.
भारत मोहन बर्डे वय ४० रा. नेवासा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृतदेहाजवळ रोजगार हमीचे कार्ड मिळून आले आहे. बर्डे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील,भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. बर्डे हे गरीब कुटुंबातील असून रोजंदारीवर उदरनिर्वाह असल्याने कोरोना संकटात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्याच्यावर बेकारीची अवस्था निर्माण झाली होती. अखेर नैराश्येतून त्यांनी गुरुवारी दौंड मनमाड रेल्वे मार्गावर श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव स्थानकाजवळ रेल्वेजवळ आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे.
Web Title: commits suicide by jumping under a train due to lack of employment