संगमनेरातील एकाने फेसबुकवर महसूलमंत्री थोरात यांच्यावर आक्षेपार्हे पोस्ट
संगमनेर | Crime: शुक्रवारी दुपारी संगमनेर शहरातील चैतन्यनगर येथील एकाने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थोरात यांचा अवमान होईल अशी पोस्ट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश हौशीराम भोर रा. चैतन्यनगर असे या गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कॉंग्रस कार्यकर्ते सिद्धेश विनोद घाडगे रा. खंडोबा गल्ली यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविषयी आक्षेपार्हे पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट थोरात यांचा अवमान करणारी त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रहदूषित होऊन भोर याने ही पोस्ट केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भोर याच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील त्यास कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या पोस्टच्या प्रिंट काढून पोलिसांना दिल्या आहेत. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गोरे हे करीत आहे.
Web Title: Offensive post on Revenue Minister Thorat on Facebook crime filed