Home अहमदनगर Mucormycosis: अहमदनगरमध्ये म्युकरमायक्रोसिस दोन जणांचा मृत्यू तर  8 जणांना लागण

Mucormycosis: अहमदनगरमध्ये म्युकरमायक्रोसिस दोन जणांचा मृत्यू तर  8 जणांना लागण

Ahmednagar Mucormycosis patient two death and six active

अहमदनगर | Mucormycosis: देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाचा आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट उभे राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायक्रोसिसचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आठ जणांना लागण झाली असून दोन जणाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर उपचार घेत असताना स्टुराईट किंवा इतर ड्रग वापरली जातात. त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये हा बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होतो. जिल्ह्यात या आजाराचे  ८ रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ६ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने डोळे, कान, नाक, मेंदूचे आजार होत असतात. म्युकरमायक्रोसिस या आजारावरील औषधांचा देखील तुटवडा आहे. पुढील काही काळात या रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. असं जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांनी सांगितलं.

Web Title: Ahmednagar Mucormycosis patient two death and six active

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here