Home Accident News Accident:  कंटनेरची रिक्षाला जोरदार धडक, अपघातात पाच जण ठार

Accident:  कंटनेरची रिक्षाला जोरदार धडक, अपघातात पाच जण ठार

Nanded Accident News:  कंटनेर आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात, रिक्षाला १०० फुट फरफटत नेले, पाच जणांचा मृत्यू.

container collided with a rickshaw, five people were killed in the accident

नांदेड: नांदेड हैदराबाद महामार्गावर कंटनेर आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या कंटनेरने रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाला १०० फुट फरफटत नेले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील नांदेड-हैदराबाद महामार्गावरील मेनुर जवळ भरधाव आलेल्या कंटनेरने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकासह रिक्षातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने रिक्षाला अक्षरश: 100 फूट फरफटत नेले. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.

दरम्यान, हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची ओळख पटली असून अन्य तिघांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी बिचकुंदा पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: container collided with a rickshaw, five people were killed in the accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here