Home संगमनेर संगमनेर: जिल्हा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

संगमनेर: जिल्हा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Sangamner ATM Theft: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साकुर (Sakur) शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Attempt to break ATM theft of District Bank Ahmednagar

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साकुर शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार दि १८ जुलै २०२२ रोजी मध्यरात्री सव्वा दोन सुमारास घडली आहे. साधारणपणे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेने त्यांचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  साकुर येथे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा आहे. सदर बॅंकेचे एटीएम देखील आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शेटर उचकटण्याचा प्रयत्न केला. तसेच एटीएमच्या शेटरच्या एक साईट चोरट्यांनी तोडली, तसेच दुसरी साईट तोडत उचकटण्याचा प्रयत्न करत असताना आवाज झाला. आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिकांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. एटीएम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने नेमके किती चोरटे होते याचा तपास लागण्याची शक्यता आहे.

चोरटे एटीएमचे शेटर तोडताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे घारगाव पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Attempt to break ATM theft of District Bank Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here