Home पुणे संतापजनक! नराधम पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले- Rape

संतापजनक! नराधम पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले- Rape

Pune Crime: नराधम पतीने आपल्या मित्रालाच पत्नीवर बलात्कार (Rape) करायला भाग पाडले.

husband forced his wife to have physical relations rape with a friend

पुणे: राज्यात महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील एका गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम पतीने आपल्या मित्रालाच पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास लावले.

याप्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखर (ता. बारामती) असं आरोपी मित्राचं नाव आहे. त्याच्यासोबत पीडित महिलेच्या पतीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, , आरोपी शेखर हा पीडित महिलेच्या पतीसोबत तिच्या घरी आला होता. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन करून जेवण केलं. त्यानंतर पीडितेच्या पतीने शेखर याच्यासोबत पत्नीला शारिरीक संबध प्रस्तापित करण्यास भाग पाडले.

रात्री उशिरा संबंधित महिलेच्या पतीने आपल्या मित्राला या पत्नीवर अत्याचार करायला लावला. संताजनक बाब म्हणजे जेव्हा आरोपी शेखर हा पीडित महिलेवर बलात्कार करत होता. तेव्हा महिलेचा पतीही त्याला हे घृणास्पद कृत्य प्रवृत्त करत होता. दरम्यान, पीडितेने अत्याचार होत असताना विरोध केल्याने आरोपी शेखर आणि तिच्या पतीने पीडितेला मारहाण सुद्धा केली.

याप्रकरणी पीडितेने सोमवारी सकाळी बारामती पोलीस ठाणे गाठत तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची पोलिसांसमोर आपबीती सांगितली. पीडितेची आपबिती ऐकून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीसह आरोपी माळशिकारे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title: husband forced his wife to have physical relations rape with a friend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here