Home महाराष्ट्र राज्यातील शिवसेनच्या या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

राज्यातील शिवसेनच्या या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Chief Minister Eknath Shinde: १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट.

12 MPs of Shiv Sena met Chief Minister Eknath Shinde today

मुंबई | Chief Minister Eknath Shinde: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करून महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडवणीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे राज्यभरातील नेते शिंदे गटाला पाठींबा देत आहेत. आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमत्री यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल होत आहे.

त्यामुळे आता या बारा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच हा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार असून, या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे १२ खासदार सामील होणार आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत अमित शाहांच्या सोबत बैठक झाली होती.

राहुल शेवाळे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट घेतली आहे.

Web Title: 12 MPs of Shiv Sena met Chief Minister Eknath Shinde

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here