Home क्राईम Rape | धक्कादायक: पोलीस उपनिरीक्षकाने गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Rape | धक्कादायक: पोलीस उपनिरीक्षकाने गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Nagpur rape Case: गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाला अटक.

police sub-inspector rape a minor girl by giving her gungy medicine

नागपूर: नागपूरमधून केअरटेकरनेच घात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज असल्याचे सांगून चिखलदरा येथे नेऊन पोलीस उप निरीक्षकाने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. सदर मुलगी नागरापुरात आल्यावर तिने आई वडिलांना सर्व प्रकार कथन केला. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. सदर घटना १३ जुलै रोजी घडली.

नागपुरातील नक्षलविरोधी अभियानात कार्यरत असलेल्या प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय 35, रा. फ्रेन्ड्स कॉलनी, गिट्टीखदान) असे आरोपी पोलीस निरीक्षकाचे  नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नक्षलविरोधी अभियानात तो पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वीच ओळखीत असलेल्या 17 वर्षीय मुलगी त्याच्या संपर्कात आली. ती 12 वी मध्ये शिकते. तो तिचा केअरटेकरही होता हे विशेष. त्याचा फायदा घेत त्याने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असल्याचे सांगून 13 जुलैला चिखलदरा येथे चारचाकी वाहनात नेले. तिथे एका लॉजवर नेले. दरम्यान त्याने ज्युसमधून गुंगीचे औषधही दिले. या दरम्यान त्यांनी दारूचेही सेवन केले. यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यासोबत अत्याचार (Sexual abusing) झाल्याची बाब लक्षात आली. तिने विरोध केला. मात्र, याबाबत कोणाला काही सांगितल्यास  जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतरही त्याने तिला निर्वस्त्र करीत, फोटो काढून स्वतःजवळ ठेवले. तसेच ते व्हायरल करीत, बदनामी करण्याची धमकी दिली.

नागपुरात परत आल्यावर मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यातून त्यांनी पोलिस ठाणे गाठून प्रदीपकुमार विरुद्ध तक्रार दिली. आरोपीला अटक (arrested) करण्यात आली आहे.

Web Title: police sub-inspector rape a minor girl by giving her gungy medicine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here