Home अहमदनगर अहमदनगर: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या- Suicide

अहमदनगर: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या- Suicide

Ahmednagar | Jamkhed Suicide Case: घरात एकटी असताना विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

Suicide of an engineering student

जामखेड: जामखेड जामखेड शहरातील रसाळनगर भागातील नुरानी बेकरीजवळ राहणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. रविवारी (दि. १७) रात्री सात वाजता ही घटना घडली. या  प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

साक्षी दिलीप भोसले (वय २०, रा. रसाळनगर, नुरानी बेकरीजवळ, जामखेड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. रविवारी रात्री सातच्या सुमारास साक्षी भोसले ही घरात एकटी होती. या दरम्यान साक्षी हिने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल केले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शशांक शिंदे यांनी तिचे शवविच्छेदन केले. तिने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मृत साक्षी ही पुणे येथील इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. जामखेड येथील नागेश विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भोसले यांची ती मुलगी होती. सोमवारी (दि. १८) सकाळी घुमरा पारगाव (ता. पाटोदा) या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Suicide of an engineering student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here