Home महाराष्ट्र ब्रेकिंग! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

ब्रेकिंग! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

Sanjay Pande Arrested: संजय पांडे यांना ईडीने अटक, फोन बेकायदेशीररित्या टॅप केले जात असल्याचा आरोप.

Sanjay Pande Arrested

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज  कॉ-लोकेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने ही त्यांना अटक केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. ईडीच्या चौकशीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन हे बेकायदेशीरपणे टॅप केल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे १९९७ पासून हे फोन बेकायदेशीररित्या टॅप केले जात असल्याचा आरोप पांडे यांच्यावर होता. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू होती. पांडे हे चौकशीत सहकार्य करत नसल्याची तक्रार ईडीने दिल्लीत कोर्टात सांगितली होती. दरम्यान, आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे.

Web Title: Sanjay Pande Arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here