Home अकोले अकोले तालुक्यात करोना रुग्णांची वाढ सुरूच, जिल्ह्यात १२८८ रुग्णांवर उपचार

अकोले तालुक्यात करोना रुग्णांची वाढ सुरूच, जिल्ह्यात १२८८ रुग्णांवर उपचार

Corona patients continue to grow in Akole taluka

अकोले | Akole: तालुक्यात आज बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३२४७ इतकी झाली आहे. तालुक्यातील पाच रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथील ७० वर्षीय पुरुष, राजूर येथील २३ वर्षीय तरुण, सुगाव बुद्रुक येथील ७५ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथील ३५ वर्षीय पुरुष, पळसखेडे येथील ४५ वर्षीय पुरुष असे पाच जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज २१५ नवे बाधित आढळून आले आहेत. तर १७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७६ हजार ५३६ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात एकूण ११४८ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १२८८ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona patients continue to grow in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here