Home श्रीरामपूर बेलापूरच्या व्यापारी अपहरण कर्त्याचे रेखाचित्र तयार

बेलापूरच्या व्यापारी अपहरण कर्त्याचे रेखाचित्र तयार

Drawing of the abductor of Gautam Hiran of Belapur

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण झाल्या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीतले व्हीडीओ तपासले असता तसेच स्थानिक लोकांच्या सागण्या वरून पोलिसांनी आरोपीचा चेहरा रेखाटला आहे. ज्या गाडीतून त्यांचे अपहर झाले त्या गाडीचा देखील शोध घेण्याचा पर्यन्त पोलीस करत आहे

काही संशयित लोकांची चौकशी केली गेली आहे. अपहरण हे व्यापारच्या वादातून झाले तर नाही ना ? त्या दुष्टीने देखील तपास केला जात आहे. सीसीटीव्ही मधील चित्रण आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीतून जे रेखाचित्रण तयार केले आहे, त्या आरोपीचा शोध घेण्यासठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी काही पथक तयार केले आहे. या पथकाने बेलापूर बरोबर श्रीरामपूर तालुकयात देखील तपासाची सुरुवात केली आहे. या आरोपी विषयी काही माहिती मिळाली तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या अपहरण झालेल्या घटनेवरून लोकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे लवकरात लवकर या तपासाचा छडा लावून आरोपीला पकडावे अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके हे पुढील तपास करीत आहे.  

Web Title: Drawing of the abductor of Gautam Hiran of Belapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here