Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यात आज २० करोनाबाधित

अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यात आज २० करोनाबाधित

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज २० करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये नगर शहरात तेरा, कर्जत तालुका दोन, शेवगाव, पारनेर, जामखेड, राहुरी, भिंगार प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी ०१ आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे ०१ रुग्ण आढळून आला.

गवळीवाडा (भिंगार) ०१,  राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१,  रानेगाव (शेवगाव) ०१,  जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला.

नगर शहरात भराड गल्ली येथे ०६,  तोफखाना ०४,  शास्त्रीनगर ०१,  सातभाई मळा ०१ आणि गानु बाजार येथे ०१ रुग्ण आढळून आला.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ६३८ झाली आहे तर बरे झालेल्यांची संख्या ४१८ झाली आहे. करोना बाधित मृतांची संख्या १७ वर आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 20 patient infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here