Home अहमदनगर करोनामुक्तीत राज्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर

करोनामुक्तीत राज्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात रोज वाढतात २० ते २५ रुग्ण, जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर केवळ ३२ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात मागील महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८० टक्के च्या पुढे होते मात्र मागील आठवड्यापासून रोज २० ते २५ हा रुग्णांचा आकडा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तेवढे रुग्णही घरी सोडले जात आहे. सध्या बरे होऊन घरी गेलेल्यांचे प्रमाण हे ६८ टक्के आहे. 

जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने रुग्णांची बरे होण्याची संख्या ही समाधानकारक आहे. आता आठ ते दहा दिवसांनी रुग्ण बरे होत आहे. त्यांना घरी सोडले जात आहे. सरासरी रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या २५ इतकी आहे तर सरासरी रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या १५ आहे. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे रुग्ण उपचार घेत आहेत. तर काही रुग्ण इतर जिल्ह्यातही उपचार घेत आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Corona Free Ahmednagar leads in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here