संगमनेर शहरातील सय्यदबाबा चौक येथील करोनाबधीताचा मृत्यू
Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागात सय्यदबाबा चौक येथे दिनांक ३ जुलै रोजी एका ७० वर्षीय वृधास करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या ७० वर्षीय वृद्धाचा आज पहाटे करोनाने बळी घेतला आहे.
सय्यद बाबा चौक येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा अहवाल नाशिक विभागाकडून संगमनेर प्रशासनाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधित मृत्यूची संख्या १२ झाली आहे.
संगमनेर तालुक्यात करोनाचा कहर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच दिवशी २२ रुग्ण आढळून आल्याने कुरण गाव हे हॉटस्पॉट करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५० पार झाली असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संगमनेर तालुक्यात ९ जुलै रोजी संगमनेर येथे प्रशासकीय नियोजन करण्यासाठी येणार आहेत. वाढती रुग्ण संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. संगमनेर तालुक्यात प्रशासनाने ठोस अशी पाउले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner Sayyadbaba Chauk one death