Home महाराष्ट्र महसूलमंत्री थोरात झाले होम कॉरांटाइन, शासकीय बंगल्यावरील टेलीफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह

महसूलमंत्री थोरात झाले होम कॉरांटाइन, शासकीय बंगल्यावरील टेलीफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह

मुंबई: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम कॉरांटाइन केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी २० जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले आहे.

करोनाने सामान्य नागरीकांबरोबरच राजकीय नेते यांना विळखा घातला आहे. अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाची लागण झाली होती. आता बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने स्वतःला होम कॉरांटाइन करून घेतले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Balasaheb Thorat Home quarantine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here