Home अहमदनगर अहमदनगरमध्ये आणखी दोन जण बरे, आत्तापर्यंत इतके जण झाले बरे

अहमदनगरमध्ये आणखी दोन जण बरे, आत्तापर्यंत इतके जण झाले बरे

अहमदनगर: नगरमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा जेवढा वेगाने वर गेला तेवढा वेगाने तो खालीही आला आहे. आज बुधवारी बूथ हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगरमध्ये बरे झालेल्या रुग्णाची संख्या २० झाली आहे. आता फक्त ९ जणांवर उपचार चालू आहेत.

अहमदनगरमध्ये करोना बाधितांचा एकूण आकडा ३१ वर गेला आहे. त्यातील जामखेड व कोपरगाव या तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. २० जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आता बूथ हॉस्पिटलमध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील आष्टी येथील एक जण आहे. जामखेड ५, संगमनेर ४ नगर शहर ८ व नेवासा १ अशा १८ जणांना डिस्चार्ज मिळालेला होता. आज नगर शहरातील मुकुंदनगर व राहता तालुक्यातील लोणी अशा दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आहे. त्यांना संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar another two well  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here