Home संगमनेर संगमनेर: पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

संगमनेर: पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील प्रवरा नदीपात्रात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या शरद भागाजी पर्वत (वय २४) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दाढ खुर्द येथील तीन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेले होते यावेळी शरद पर्वत हा तरुण बुडाला असून याची माहिती आश्वी पोलिसांना कळताच निरीक्षक सुधाकर मांडवकर, मुख्य हवालदार मोरे, ग्रामसेविका वाळे, कामगार तलाठी सांगळे, सरपंच सुमनबाई जोशी, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी हवालदार संतोष शिंदे, शिवाजी नऱ्हे तसेच गावातील संदीप बोरसे, गोट्या पर्वत, दत्तू मेंगाळ कार्तिक कहार आदींनी नदीपात्रात उतरून शरदचा शोध सुरु केला अथक प्रयत्नानंतर शरदाचा मृतदेह सापडण्यात आला असून त्याचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर शवविचेदानासाठी मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.   

Website Title: Latest News young man swim drowned in a river Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here