Home अहमदनगर संगमनेरमध्ये आणखी चार जणांना करोनाची लागण नगरचा आकडा ३७ वर

संगमनेरमध्ये आणखी चार जणांना करोनाची लागण नगरचा आकडा ३७ वर

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आणखी चार जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चारही रुग्ण काही दिवसांपूर्वी लोणी प्रवरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते.

त्यांचे घश्याचे स्त्राव पिणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या चारही जणांचा अहवाल प्राप्त झाला असून ते करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण संख्या ३७ वर पोहोचली आहे. या चारही जणांना सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने ते उपचार घेत होते. आता जामखेड दोन  व संगमनेर येथील चार जणांच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बुधवारी रात्री जामखेड येथील दोघांना करोनाची बाधा झाली असल्यामुळे अहमदनगरमधील करोनाबाधितांचा आकडा ३७ वर गेला आहे.    

Website Title: Coronavirus sangamner four patient found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here