Home अहमदनगर महामार्गावर भरधाव टॅकरणे पोलीस कर्मचाऱ्याला उडविले

महामार्गावर भरधाव टॅकरणे पोलीस कर्मचाऱ्याला उडविले

अहमदनगर: नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव टॅकरणे उडविल्याची घटना घडली आहे. अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

बायपास येथे वाहने सोडविण्यासाठी बेरीकेट लावण्यात आले आहेत त्याठिकाणी मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहे. औरंगाबादच्या दिशेने आलेला हा टॅकरणे बायापासने एमआयडीसीकडे गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जात असताना बेरीकेट उडवून दिले याचदरम्यान उभा असलेला शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. टॅकर चालक हा फरार झाला आहे. इतर पोलीस कर्मचारी यांनी शेख यांना नगरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच टॅकर चालकाचा शोध सुरु आहे.

Website Title: Latest News highway blew up a police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here