Home अहमदनगर संगमनेरमध्ये नवीन हॉटस्पॉट पॉकेट जाहीर ह्या तारखेपर्यंत कडक निर्बंध

संगमनेरमध्ये नवीन हॉटस्पॉट पॉकेट जाहीर ह्या तारखेपर्यंत कडक निर्बंध

संगमनेर: आज दिनांक २३ एप्रिल २०२० रोजी संगमनेर शहरातील चार व्यक्तींना करोना विषाणूची लागण झालेली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी करोणाचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथ रोग अधिनियम १८९७ अनन्वे निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार त्यांना  प्राप्त झालेल्या अधिकारानुसार रहेमत नगर, जमजम कॉलनी, अलका नगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उम्मद नगर, एकता नगर, शिंदे नगर, नाईकवाडीपुरा (संगमनेर शहर) हे क्षेत्र  HOTSPOT POCKET म्हणून घोषित करण्यात येत आहे व तसेच सदरच्या क्षेत्राच्या मध्यबिंदू पासून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर हा CORE AREA म्हणून घोषित केला आहे. सदर क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री, इत्यादी दिनांक २३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपासून ते दिनांक ७ मे २०२० रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर क्षेत्रातील नागरिकांचे व आगमन प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे.  

Website Title: Latest News Sangamner Hotspot centre

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here