Home अकोले लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी राजूरच्या तत्कालीन ग्रामसेवकास अटक

लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी राजूरच्या तत्कालीन ग्रामसेवकास अटक

अकोले: अकोले तालुक्यातील राजूर, शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ करून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून पसार असलेला तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग याला गुरुवारी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.

अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे वय ५१ संगमनेर यांनी २८ नोव्हेंबर रोजी राजूर पोलिसांत बडतर्फ करण्यात आलेला ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग यांच्या विरोधात दप्तर गहाळ करून अपहार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी कलम ४०९ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तालुक्यातील शेणीत व आंबेवंगण यातील ग्रामपंचायतीचा कार्यभार नोव्हेंबर २०१३ ते मे २०१८ या वर्षातील ग्रामपंचायतीचे पदभार ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग यांनी स्वीकारला होता यातील काही कालावधीत त्यांच्याकडे राजूर ग्रामपंचायतचाही अतिरेक कारभार सोपविण्यात आला होता. राजूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक रणशिंग यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ करून काही लाख रकमेचा अपहार केला होता. शेणीत व आंबेवंगण ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना त्यांच्या ताब्यातील ग्रामनिधी व १४ वा वित्त आयोग  पेसा ,ग्रामसभा, कोषनिधी पाणीपुरवठा निधी या खात्यावरील एकूण ९४ लाख ९७ हजार  ६९२ रुपये रक्कम मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करत सदरचे दप्तर गहाळ करून अपहार केला होता या कालावधीत करण्यात आलेला आर्थिक व्यवहाराचे दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. ग्रामपंचायत दप्तर कार्यालयात बंधनकारक असतानासुधा ग्रामपंचायत कार्यालयात दिले नाही त्यामुळे तपासणी करता आली नाही आदी बाबीवरून विस्तार अधिकारी सरोदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Website Title: Latest News Rajur Gram Sevak arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here