Home संगमनेर संगमनेर: पिंजरयातील गज वाकवून बिबट्या फरार

संगमनेर: पिंजरयातील गज वाकवून बिबट्या फरार

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील भोरमळा येथे पिंजर्यात अडकलेला बिबट्या गज वाकवून फरार झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अकलापूर शिवारातील भोरमळ्यात त्याठिकाणी तेजस मधे यांची शेती वाट्याने केली आहे. शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री ७ ते ८ यादरम्यान ते कांद्याला पाणी भरत होते यावेळी त्यांच्या जवळ असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण मधे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला होता. वनविभागाने दुसऱ्या दिवशी पिंजरा लावला होता. दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्या त्यात अडकला होता. मात्र या बिबट्याने दाताच्या सहायाने गज वाकवले आणि आपली सुटका करून घेतली.

दुसऱ्या दिवशी वनविभागाने पिंजर्याची पाहणी केली यावेळी पिंजर्याची फळी ही निघून आल्याचे दिसून आले. कारागिराला बोलावून पिंजरा दुरुस्त करून घेण्यात आला. ठिकठिकाणी कांदे काढण्याचे काम सुरु आहे त्यामुळे मेंढपाळ मेंढ्या घेऊन परिसरात आले आहे. हे बिबटे या मेढ्यांना ठार करत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी थेटे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही पिंजरे जुने झाले असून खालच्या बाजूने फळ्या असल्याने पावसाचे पाणी लागून ते खराब होतात. ते यासाठी फायबरचे पिंजरे असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  

Website Title: Latest News Bibtya bending the yard in the cage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here