Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज सहा रुग्ण करोनाबाधित तर ६६ करोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यात आज सहा रुग्ण करोनाबाधित तर ६६ करोनामुक्त

Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यात आज रविवारी ६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे सर्व बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६३४ ;झाली आहे.

यामध्ये संगमनेर ३५, नगर शहर १६, जामखेड २, कर्जत २, पारनेर २, श्रीगोंदा ५, अकोले १, बीड १, शेवगाव १, नगर ग्रामीण १ यांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून सहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

यामध्ये नगर शहरातील सर्जेपुरा येथील ०३, पाईपलाईन रोड १, नगर ग्रामीण विळद येथे १, पाथर्डी येथे १ रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ९६३ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३०७ रुग्ण उपचार घेत आहेत. काल शनिवारी रात्री २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar Sangamner Akole News Update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here