Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विहिरीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

संगमनेर तालुक्यात विहिरीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात संपत विष्णू मगर यांच्या मालकीची लोणी तळेगाव रस्त्यालगत विहीर आहे. संपत मगर हे रविवारी दुपारी विहिरीजवळून जात असताना त्यांना दुर्गंधीचा वास आला त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता त्यांना अज्ञात २५ ते ३० वयाच्या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील सुनील मगर यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुगणालयात पाठविण्यात आला.  सदर महिलेचा घातपात झाला की आत्महत्या याची माहिती समजू शकली नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka found undefined death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here