अकोले शहरात एक, संगमनेर तालुक्यात नऊ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: आज रविवारी खासगी प्रुरयोगशाळा रुग्णालयातून करोना तपासणी करून अकोले शहरात एक तर संगमनेर तालुक्यात ९ करोनाबाधित आढळून आले आहेत.
अकोले शहरातील हासे कॉम्प्लेक्स येथे एका पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. या पुरुषाचा खासगी तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे.
संगमनेर शहरात मालदाड रोड येथे एक महिला व एक पुरुषास करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर जनतानगर, जोर्वे रोड, अरगडे गल्ली, विद्यानगर, ऑरेंज कॉर्नर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
संगमनेर तालुक्यात निमोण येथे एका पुरुषास तसेच कौठे धांदरफळ येथे एक व्यक्ती आढळून आला आहे. या सर्वांची तपासणी खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner Akole corona patient found