Home Accident News राजूर: कारला अपघात झाल्याने पर्यटकांचे बिंग उघड, गुन्हा दाखल

राजूर: कारला अपघात झाल्याने पर्यटकांचे बिंग उघड, गुन्हा दाखल

राजूर(Akole): अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात झाल्याने चार जण भंडारदरा येथे पर्यटनाला निघाल्याचे उघडकीस आले. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी चौघांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विवेक हेमंत  जाधव वय २१, अक्षय प्रकाश कुऱ्हाडे वय २४, अजय देवराम गीते वय २५ रा. राहुरी, अक्षय दिलीप मांजरे श्रीरामपूर या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी हे चार तरुण कारने(एम.एच. ०३, बी.सी.२९४५) भंडारदरा येथे पर्यटनासाठी चालले होते. जात असताना जामगाव जवळील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाखाली उतरली. मात्र कारचा मागचा भाग कठड्याला अडकली होती. तेथे सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. ते तरुण बचावले. अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलीस स्टेशनचे अंमलदार भडकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. जे सी.बी. च्या सहायाने कार वरती काढण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर या चौघांवर राजूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Rajur tourists exposed due to car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here