Home अहमदनगर संगमनेरातील एकाचा तर नगर येथील कापडबाजारातील व्यापाऱ्याचा करोनाने मृत्यू

संगमनेरातील एकाचा तर नगर येथील कापडबाजारातील व्यापाऱ्याचा करोनाने मृत्यू

Coronavirus/अहमदनगर: आज सोमवारी सकाळी कापड बाजारातील एका १४ वर्षीय तरुणाचा करोनाने मृत्यू झाला आहे. सदर तरुण हा कापड बाजारातील एक व्यापारी होता. मागील आठवड्यात याच तरुणाच्या वडिलांचा करोनाने मृत्यू झाला होता.

संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथे ३ जुलै रोजी ६३ वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढळून आला होता. सदर ६३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात आजपर्यंत करोनाने १४ बळी घेतले आहे. संगमनेर तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २३२ झाली आहे. सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात ८० जनांवर उपचार सुरु आहेत. काल रविवारी तालुक्यातील ३५ जण करोनामुक्त झाले आहेत. काल सायंकाळी १० जणांचे खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar and Sangamner two death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here