Home श्रीगोंदा धक्कादायक: श्रीगोंदा तालुक्यात आढळले १२ करोनाबाधित  

धक्कादायक: श्रीगोंदा तालुक्यात आढळले १२ करोनाबाधित  

श्रीगोंदा(Shrigonda): अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आज सोमवारी एकाच दिवशी बारा करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा शहरात एकूण ८ तर कोळगाव, वडाळी, लोणी व्यंकनाथ, गार येथे प्रत्येकी एक जण आढळून आला आहे असे एकूण १२ करोनाबाधित आढळले आहेत.

श्रीगोंदा शहरातील एकाच कुटुंबातील आठ जण आढळून आल्याने करोणाचा चांगलाच प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भीमाकाठच्या गार गावातही करोनाची सुरुवात झाली आहे. तेथे दौंड येथून करोनाचा शिरकाव झाल्याचे समजते. तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shrigonda taluka 12 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here