Home अकोले राजूर आणि कोतुळ आदिवासी भागात 108 रुग्णवाहिकेची सेवा डॉक्टरांविना

राजूर आणि कोतुळ आदिवासी भागात 108 रुग्णवाहिकेची सेवा डॉक्टरांविना

राजूर(Akole):  अकोले तालुक्याच्या राजूर आणि कोतुळ पट्ट्यातील आदिवासी भागात 108 या रुग्ण वाहिकेची सेवा डॉक्टरांविना सुरू आहे.यामुळे या सेवे बाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधून संताप व्यक्त होत आहे.,

तालुक्यात २०१४ मध्ये अकोले आणि आदिवासी दुर्गम भागातील राजूर व कोतुळ येथे १०८ ची रुग्ण वाहिका सुरू झाली.या वेळी प्रत्येक रुग्ण वाहिकेसाठी तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र काही वर्षांत डॉक्टर सोडून गेले.या नंतर काही नव्याने डॉक्टर हजर झाले.मात्र यातीलही काही सोडून गेले.

यानंतर अकोले येथे दोन तर राजूर व कोतुळ येथे प्रत्येकी एक डॉक्टर उपलब्ध होते.राजूर येथे तर एकच डॉक्टर चोवीस तास ड्युटी करत होते.मात्र सध्य परिस्थितीत केवळ अकोले येथे दोन डॉक्टर कार्यरत आहेत.राजूर आणि  कोतुळ येथील या रुग्ण वाहिकेवर एकही डॉक्टर उपलब्ध नाहीत.राजूर कोतुळ या दुर्गम भागातील अनेक ठिकाणी घाट रस्ते आहेत त्यामुळे अनेक वेळा अपघात होत असतात.तर पावसाळ्याच्या दिवसात विषारी सापांचे प्रमाणही अधिक असते.त्यामुळे अशा रुग्णांना तात्काळ सेवा मिळणे अपेक्षित असते.

१०८ क्रमांक डायल केल्यास रुग्णवाहिका येत असते मात्र सर्व प्रकारची औषधे आणि सामुग्री उपलब्ध असणाऱ्या या रुग्णवाहिकेत तातडीने उपचार सुरू करण्यास डॉक्टरच उपलब्ध नाहीत.त्यामुळे रुग्णांना तात्काळ सेवा मिळु शकत नाही.तर येथील ग्रामीण रुग्णालयातून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण अन्यत्र हलविण्यासाठी रुग्ण वाहिका मिळते मात्र रस्त्यात काही घडल्यास या रुग्ण वाहिकेत डॉक्टरच नसतात प्रसंगी रुग्णाला अशा वेळी आवश्यक ती सेवा मिळू शकत नाही.रुग्णवाहिकेत डॉक्टरच उपलब्ध नसतील तर केवळ चालकांच्या भरवशावर  रुग्ण स्थलांतरित करायचे का ?तसेच एकदा वेळ प्रसंग आल्यास कोणाला सांगायचे असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे संबधित यंत्रणेने तात्काळ या रुग्ण वाहिकांवर तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी राजूर आणि कोतुळ परिसरातून होत आहे.

मागील दीड वर्षापूर्वी डॉक्टरांची भरती करण्यात आली होती मात्र यातील काही डॉक्टर हजर झाले. कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात जिल्हाधिकारी यांच्याआदेशानुसार डॉक्टरांविना रुग्णवाहिका सुरू आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डॉक्टरांची भरती करणार असल्याचे १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनच्या जिल्हा व्यवस्थापक सुवर्णमाला गोडे यांनी सांगितले

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka Rajur Kotul 108 services without Doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here