Home क्राईम निमगाव जाळी येथे चोरट्यांनी हॉटेलचे दारूचे गोदाम फोडले

निमगाव जाळी येथे चोरट्यांनी हॉटेलचे दारूचे गोदाम फोडले

संगमनेर(Sangamner): तालुक्यातील निमगाव जाळी शिवारात लोणी संगमनेर रस्त्यावरील हॉटेल गोविंदच्या गोदामामधून रविवारी रात्री दारूच्या बाटल्या चोरल्याची घटना घडली आहे. यावेळी हॉटेल कामगाराला विरोध केल्याप्रकरणी जबर मारहाण करत जखमी केले.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात लखन उर्फ लक्षमण संपत खरात याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास आमच्या हॉटेल गोविंदमध्ये कामगारांना जेवण तयार करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हॉटेलच्या मागे असलेल्या गोदामामधून आवाज आला त्यामुळे कामगार मोहित पंडित याला काय झाले ते पाहण्यासाठी पाठविले होते. यावेळी मोहित पंडित हा धावत आला त्याच्यावर कटावणीने वार करत चोरटे पळून गेले. व गोदामाच्या खिडकीचे ग्रील व दरवाजाचे कुलूप तोडून सहा जण चोरी करत असल्याची माहिती दिली.

यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक शांताराम झोडगे, प्रवीण दैनिमाळ यांनी चिंचपूर शिवारात अस्मिता डेअरीजवळ तिघांना पकडल्याचे कळविले.

सुलतान शेख, आरिफ शेख दोघेही रा. बेलापूर ता. श्रीरामपूर आवेज उर्फ बाबा शेख रा. रामगड ता. श्रीरामपूर, शाहरुख शहा आरिफ शेख व एक अनोळखी व्यक्ती पळून गेल्याचे समजते. यावेळी हॉटेलमधून ३ हजार ८४० रुपयांची दारू चोरीला गेली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक पिकअप आश्वी पोलीस ठाण्यात आणण्यात आलेली आहे.  यातील तीन चोरटे पकडण्यात आले आहेत सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Nimgav Jaali Hotel theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here