Home अकोले अकोले: कारखाना रोड कंटेनमेंट झोन २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी

अकोले: कारखाना रोड कंटेनमेंट झोन २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी

Akole Taluka Karkhana Road Contentment zone

अकोले(Akole): अकोले शहरातील कारखाना रोडला एका कॅाम्पलेक्स मध्ये काल रविवारी राञी एका पतसंस्थेतेचा कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाने कारखाना रोड कंटेनमेंट झोन करत संपर्कातील २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले तर १५० घरातील अंदाजे १०५० लोकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे.तालुक्यातील अतापर्यत एकूण रुग्णांची संख्या झाली ४१ त्यापैकी ३० कोरोनामुक्त तर १० जणांवर  उपचार सुरु एकाचा मृत्यू झाला आहे.

अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील रोज वेगवेगळ्या गावात कोरोना पॅाझिटीव्ह रुग्ण आढळत आहे. ग्रामीण भागानंतर सुरूवातीपासून सुरक्षित राहिलेले अकोले शहरात काल कोरोनाने शिरकाव केला. काल रविवारी राञी शहरातील कारखाना रोडला एका कॅाम्पलेक्समध्ये राहणारा एका पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.हा रुग्ण संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे आढळुन आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याचा माहिती आहे. हा अहवाल आल्याचे कळताच शहरात खळबळ उडाली व नागरीक भयभीत झाले.

प्रशासनाने तात्काळ दखल घेत तहसीलदार मुकेश कांबळे,मुख्याधिकारी डॅा.सचिन पटेल,तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.इंद्रजीत गंभीरे,पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी कर्मचाऱ्यांसह कारखाना रोडला जावुन सकाळी कारखाना रोडला बॅरीगेट लावत  कॅाम्पलेक्स व परीसर कंटेनमेंट झोन घोषित केला.यावेळी कंटेनमेंट झोन केलेेेल्या परिसरात तब्बल १५०घरातील जवळपास १०५० लोकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे व संपर्कातील व पतसंस्थेेेतील कर्मचा-यासह २४ जणांचे स्वॅब घेेेऊन ते तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णणालयातील प्रयोगशाळेत पाठविले आसल्याची माहिती तालुका वैैैैद्यकीय अधिकारी डॅॅा.इंद्रजीत गंभीरे यांंनी दिली. 

तालुक्यात आतापर्यत कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या ४१ झाली आहे त्यापैकी ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ब्राम्हणवाडा येथील ०५,पिपंळगाव निपाणी ०२,विरगाव ०१,देवठाण ०१,व अकोले शहरातील ०१ अशी १० रुग्णांवर उपचार सुरु आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.

अकोले शहर सात दिवसांसाठी बंद ?

अकोले शहरातील व्यापारी, विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, व व्यापारी संघटना यांनी अकोले शहरात कोरोनाचा शिरकाव होत कारखाना रोडला बाधित रुग्ण आढळल्याने एकमताने निर्णय घेउन अकोले शहर आज १४ जुलै २०२० ते २० जुलै २०२० पर्यत अकोले शहर अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .याबाबत दुपारी शहरातून दवंडी देणारी रीक्षाही फिरवण्यात आली आहे.तालुक्यातील लोकांनी अकोले शहरात कामाशिवाय येऊ नये असे आवाहन अकोलेकर करताना दिसत आहे. शहरातून दुचाकीवरून डबल शीट व विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी करवाई करताना दिसत होते.

Web Title: Akole Taluka Karkhana Road Contentment zone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here