Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे एक करोना पॉझिटिव्ह एकूण ९०

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे एक करोना पॉझिटिव्ह एकूण ९०

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी  येथील ३८ वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आली आहे.

त्याला आजाराची लक्षणे आढळून आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. गुंजाळवाडी येथे पहिलाच रुग्ण आढळून आला आहे. संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ९० वर पोहोचली आहे.

तसेच संगमनेर तालुक्यातील एकाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढतच चालली आहे. आता या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे.

Website Title: Coronavirus gunjalwadi one corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here