Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आणखी तीन नवे करोना रुग्ण, संगमनेरातील एक

अहमदनगर जिल्ह्यात आणखी तीन नवे करोना रुग्ण, संगमनेरातील एक

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज तीन नवे करोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २६९ झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावात एक ३८ वर्षीय युवक आढळून आला आहे. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात झाला होता.

राशीन येथे ६० वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. तो पुण्याहून राशीन येथे आला होता.

कांदिवली येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या ६८ वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढळून आला आहे.

तसेच संगमनेर तालुक्यातील एक जण करोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त झालेल्यांची संख्या २२० झाली आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar new patient updates

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here