Home संगमनेर संगमनेर: पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करीत जनावरे घेऊन जाणारा पिकअप पकडला

संगमनेर: पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करीत जनावरे घेऊन जाणारा पिकअप पकडला

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यात कर्हे घाट येथे काल बुधवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान  पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करीत जनावरे घेऊन जाणारा पिकअप पकडून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक नगर जिल्हा सीमेवर चेकपोस्ट बंदोबस्त करण्यात आला आहे. सायाखींडी येथे काल संध्याकाळी शिक्षक व पोलीस कर्मचारी पहारा देत होते. दरम्यान एका पिकअपने समोर उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक दिली. तसेच तेथे उभे असलेले शिक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालत तेथून त्यांनी पळ काढला.

मात्र तेथे चेकपोस्ट बंदोबस्त अधिकारी म्हणून उभे असलेले सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी सिनेमा स्टाईलने सरकारी वाहनातून पाठलाग केला व त्या पिकअपला कर्हे घाटात पकडले. त्या पिकअप मध्ये चार जनावरे होती. त्यातील आरोपीस संगमनेर पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.  

Website Title: News Caught a pickup carrying animals

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here