Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह एकूण ९२

संगमनेर तालुक्यात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह एकूण ९२

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी गुंजाळवाडी येथे एक रुग्ण आढळून आला होता. तर सायंकाळी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

यात संगमनेर शहरालगत कोल्हेवाडी येथील १८ वर्षीय तरुणी करोना बाधित आढळून आली आहे.

पुण्याहून संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर करोनाबाधितांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे. आज दिवसभरात संगमनेर तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत.

Website Title: Coronavirus Sangamner Taluka another two patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here