Home अहमदनगर ट्रॅक्टरच्या धक्क्याने भिंत कोसळून भिंतीखाली दोन चिमुकल्या ठार

ट्रॅक्टरच्या धक्क्याने भिंत कोसळून भिंतीखाली दोन चिमुकल्या ठार

श्रीरामपूर: ट्रॅक्टरचा भिंतीला धक्का लागल्याने भिंत दोन लहान मुलीच्या अंगावर कोसळून दोन चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दिनांक १८ रोजी सायंकाळी घडली.

ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे वय ४, स्तुती गुलाब गायकवाड वय ६ अशी मृत मुलींची नावे आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील बोंबले वस्तीवर प्रशांत कसबे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यांच्या शेजारीच बाळासाहेब गांगुर्डे राहत आहेत. कसबे यांच्या घरासाठी आणलेल्या विटा ट्रॅक्टरमधून उतरविल्या जात असताना त्याचदरम्यान ट्रॅक्टर कसबे यांच्या भिंतीवर आदळल्याने भिंत कोसळली. तेथेच दोन मुली खेळत होत्या. भिंत या दोघींच्या अंगावर पडल्याने दोघींचाही जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनास्थळी तातडीने भेट दिली. आमदार लहू कानडे यांनी घटनास्थळी जाऊन  सांत्वन केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Website Title: Latest News wall collapsed, killing two sparks under the wall in Belapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here