Home अहमदनगर सत्तेसाठी कॉंग्रेस लाचार, विखेंची थोरातांवर टीका

सत्तेसाठी कॉंग्रेस लाचार, विखेंची थोरातांवर टीका

शिर्डी: राज्यातील सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी आहे मात्र कॉंग्रेस नेत्यांना व मंत्र्यांना कोणी विचारत नाही लाचारासारखे सत्तेत सहभागी कसे राहतात. पप्रदेशाध्यक्ष यांना कोणी विचारात नाही याबाबत आश्चर्य वाटते अशी टीका बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसवर केली.

गुरुवारी शिर्डी येथे व्यावसायिक व विविध समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष व कॉंग्रेसवर सडकून टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष सरकारवर नाराज आहे. शिवसेनेने याला मुखपत्रातून उत्तर देत कॉंग्रेस ही जुनी खाट आहे ती कुरकुर करणारच असे अग्रलेखात लिहिले होते. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत अग्रलेख हा अर्धवट आहे, ऐकलेली माहिती आहे. पूर्ण माहिती घेऊन अग्रलेख लिहावा अस देखील थोरात यांनी म्हंटले होते.  

थोरात विरोधक राधाकृष्ण पाटील बोलले की, असे लाचार प्रदेशाध्यक्ष मी कधीच पाहिले नाही. अग्रलेख लिहिण्याची वाट का पहावी. आपल्याकडे खरच जर स्वाभिमान असेल तर सत्तेतून बाहेर पडावे. जर कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना व मंत्र्यांना कोणी विचारत नसेल तर का सत्तेत आहेत, याबाबत आश्चर्य वाटायला नको असे विखे पाटील म्हणाले.

Website Title: Latest News Congress is helpless for power

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here