Home संगमनेर विखेंना मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना मी पाहिले: विखेंना थोरातांचे जबरदस्त प्रतुत्तर

विखेंना मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना मी पाहिले: विखेंना थोरातांचे जबरदस्त प्रतुत्तर

संगमनेर(News): कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना मी त्यांना पहिले आहे. गेल्या पाच वर्षात कसे वागले ते सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१९ जून रोजी शासकीय अधिकारी, पत्रकार, डॉक्टर आदींचा सत्कार सहकारी साखर कारखान्यावर करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते.

राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांना व मंत्र्यांना कोणी विचारत नाही. लाचारासारखे सत्तेत सहभागी आहेत याबाबत आश्चर्य वाटत आहे अशी टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही जोरदार प्रतुत्तर देत संधी सोडली नाही. ते म्हणाले कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्र्याच्या पाया पडताना मी त्यांना पहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे

Website Title: News Vikhe Thorat tremendous response

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here