Home संगमनेर संगमनेर तालुक्यात महिलेला मारहाण, सात जणांवर गुन्हा

संगमनेर तालुक्यात महिलेला मारहाण, सात जणांवर गुन्हा

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दरेवाडी येथे शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे, ही घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारस घडली. या मारहाणीत महिला जखमी झाली आहे.

दरेवाडी येथे सुनिता दरगुडे ही महिला राहते. ती महिला आपल्या भावाची शेती वाट्याने करते. ती मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास टोमाटो या पिकाला खत घालीत होती. यावेळी दत्तू शंकर नागरे, लक्षमण शंकर नागरे,अनिल लक्ष्मण नागरे, महेश दत्तू नागरे, अलका लक्षमण नागरे,शैला अनिल नागरे रा. सर्व दरेवाडी ता. संगमनेर यांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   

Website Title: Latest News Woman beaten in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here