Home संगमनेर संगमनेर शहरात मास्क न वापरल्याने वाद, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर शहरात मास्क न वापरल्याने वाद, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर(News): एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी मास्क न वापरल्याने कारवाईसाठी थांबविले असता यातील एकाने कारवाई नकार देत आईला बोलावून घेतले.

आई व मुलाने पोलिसांशी वाद घालत कारवाईला विरोध केला. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लखन मारुती शिंदे वय २१ सुमनबाई मारुती शिंदे वय ५० शिवाजीनगर संगमनेर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक संदीप बोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मालदाड रोडवर नियम मोडणाऱ्यांसाठी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कारवाई करत होते. तोंडाला मास्क न लावता एकाचा गाडीवरून(एम.एच.१७ बी.टी.३३६३) दोघे जण जात होते. पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी थांबवीत गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर लखन शिंदे याने त्याठिकाणी त्याची आई सुमनबाई शिंदे हिला बोलावून घेतले. या दोघांनीही पोलिसांशी वाद घातला. सुमनबाई हिने महिला पोलिसांशी बाचाबाची केली. लखन शिंदे हा गाडी लोटत नेण्याचा प्रयत्न केला असे पोलीस नाईक बोटे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. पोलीस नाईक संदीप बोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Website Title: News Sangamner Dispute over not wearing mask

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here