Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील घटना: वीज पडून तीन गायी ठार

संगमनेर तालुक्यातील घटना: वीज पडून तीन गायी ठार

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील गायींच्या गोठ्यावर वीज पडून तीन गायी ठार झाल्याची घटना घडली.

ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात जवळपास अडीच लाख रु. किमतीचे गायी मृत्यूमुखी झाल्या आहेत.

मंगळवारी रात्री आश्वी परिसरात विजेच्या कडाकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाउस झाला. या भागात रात्री उशिरापर्यंत पाउस चालू होता.

ओझर बुद्रुक परिसरात बंधाऱ्याजवळ उत्तम बाबुराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या गायींच्या गोठ्यावर वीज कोसळली. गोठ्यात असलेल्या तीन गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

Website Title: News Sangamner Taluka Three cows were killed by lightning Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here