Home अकोले अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आणखी एक करोना रुग्ण

अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आणखी एक करोना रुग्ण

Coronavirus/ अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे २५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती हा कल्याण येथे भाजीपाला विक्रीसाठी नेत असे त्यातूनच त्यालाकरोनाची बाधा झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

दोन दिवसापूर्वी त्याला अचानक त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सदर रुग्ण हा स्थानिक असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासन करीत आहे.

दरम्यान संगमनेर तालुक्यात आज चार रुग्ण आढळून आले आहेत. यात निमोण येथील एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे तर शहरातील इंदिरानगर येथील एका ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. स्थानिक प्रशासन हे संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

आज संगमनेर तसेच अकोले तालुक्यात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.  

Website Title: Coronavirus Akole samsherpur another one patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here