Home संगमनेर संगमनेर तालुक्यात नवे चार करोना रुग्ण

संगमनेर तालुक्यात नवे चार करोना रुग्ण

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात चार नवीन करोना बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघे जण आढळून आले आहेत. यात ३० व ३१ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर गुंजाळवाडी मध्ये एक ५७ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. सदर महिला ही गुंजाळवाडी येथील स्थायीक आहे. मात्र सध्या ती इंदिरानगर येथे राहत आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.

करोनाचा शिरकाव हा गुंजाळवाडीत झालेला असला तरी सदर महिला ही बरयाच कालावधीपासून इंदिरानगर येथे राहत आहे. तरी गुंजाळवाडी परिसरातील लोकांनी घाबरून न जाता आरोग्याचे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.  

Website Title: Coronavirus Sangamner four news corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here