Home महाराष्ट्र पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या

देवळा(नाशिक): देवळा तालुक्यातील उमराणे येथील २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती आत्महत्यापूर्वी तरुणाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर सुसाईड नोट पोस्ट करत दोघांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.  

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवारी उमराणे येथील राहुल चव्हाण या तरुणाने  गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने आपल्या फेसबुक अकाऊंट वर सुसाईड नोट पोस्ट केली होती. त्यात म्हंटल्याप्रमाणे पत्नी पुंजा चव्हाण व कल्पेश सूर्यवंशी रा.मुंगसे ता. मालेगाव यांचे प्रेमसंभंध होते. शनिवारपासून १३ जून राहुलची पत्नी पूजा आपल्या चार वर्षीय मुलाला व राहुलला सोडून कल्पेश सोबत घर सोडून निघून गेली होती.

या घटनेमुळे समाजात व नातेवाईक यांच्यात बद्नामी झाल्याने तो आपले तोंड कोणालाही दाखवू शकत नाही या भीतीने राहुलने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुसाइड नोटच्या आधारे राहुलची पत्नी पूजा व तिचा प्रियकर कल्पेश या दोघंविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Website Title: News Wife commits suicide by strangulation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here