Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे अपहरण, आईची पोलिसांत तक्रार

अल्पवयीन मुलीचे अपहरण, आईची पोलिसांत तक्रार

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.

रविवार दिनांक १४ जून रोजी मध्यरात्री तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची तक्रार आईने पाथर्डी पोलिसांत दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पतीच्या निधनानंतर संबंधित फिर्यादी महिला तिसगावात स्वतः च्या घरात एक मुलगा व एक मुलगी असे तिघे जन राहतात.

शेजारच्या एका नातवाने जो पुणे येथे राहत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आमच्या मुलीसाठी मागणी घातली होती. मात्र आम्ही त्यास नकार दिला होता व पाथर्डी पोलिसांत तक्रार केली होती.

त्यानंतर रविवार दिनांक १४ जून रोजी मध्यरात्री मी व माझी मुले घरात झोपलेला होतो. मध्यरात्री मला जाग आली तेव्हा माझी मुलगी आमच्याजवळ घरात झोपलेली दिसून न आल्याने मी आरडाओरडा करून शेजारच्या लोकांना बोलावले व आजूबाजूला शोध घेतला. मात्र कुठेच शोध लागला नाही.

माझ्या मुलीस करण सर्जेराव साबळे या तरुणाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोटच्या मुलीस पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीत आईने केली आहे. याप्रकरणाचा पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करीत आहे.

Website Title: News Abduction of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here