Home अहमदनगर कोठडीत आरोपीचा चमच्याने पोट फाडून आत्महत्येचा प्रयत्न

कोठडीत आरोपीचा चमच्याने पोट फाडून आत्महत्येचा प्रयत्न

राहुरी:  मंगळवारी पहाटे राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने जामीन होत नसल्याने चमच्याने स्वतः चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

गणपत भाऊराव तुपे (वय ७५, रा. वांबोरी) असे या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुपे हा ८ एप्रिल २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. १६ जून रोजी पहाटे चार वाजेदरम्यान तुपे यांनी स्टीलच्या चमच्याने स्वतः च्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना पोलीस कर्मचारी यांना समजताच तुपे याला कोठडीतून बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी चौकशी केली असता दोन महिन्यापासून जामीन मिळत नाही तसेच कोणीही नातेवाईक भेटायला आला नाही त्यामुळे निराश होऊन मी आत्महत्याचा प्रयत्न केला अशी माहिती तुपे यांनी पोलिसांना सांगितली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: Latest News Attempted suicide by tearing the stomach 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here