Home अहमदनगर Coronavirus: अहमदनगरमध्ये आणखी तीन नवे रुग्ण

Coronavirus: अहमदनगरमध्ये आणखी तीन नवे रुग्ण

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात बोल्हेगाव, शेवगाव, राहता येथील रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी एकही रूग्ण आढळून आला नाही मात्र आज तीन करोनाबाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २६१ वर पोहोचली आहे.

कुर्ला नेहरूनगर येथून बोल्हेगाव फाटा, अहमदनगर येथे आलेल्या ४१  वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झालेली आहे.  ही व्यक्ती कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती.

राहता शहरातील एका व्यक्तीचा खाजगी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव( शेवगाव) येथे आलेला ४१ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील आज सात जण करोनामुक्त झालेले आहेत. यात संगमनेर ४, राहता २ व नगर येथील एकाचा समावेश आहे. बरे झालेल्याची संख्या आता २१३ झाली आहे.

Website Title: coronavirus Ahmednagar Three new patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here